*⚡मालवण ता.२८-: सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागून असलेल्या गोवा राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपच्या स्थानिक नेत्यांवर तेथील उमेदवारांच्या प्रचाराची जबाबदारी देण्यात आली आहे.
मांद्रे मतदार संघातील भाजपचे उमेदवार दयानंद सोपटे यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी प्रचार मोहीम राबवली. यावेळी त्यांच्या सोबत भाजपा जिल्हा उद्योग व्यापार आघाडी जिल्हा संयोजक विजय केनवडेकर, माजी नगरसेवक गणेश कुशे उपस्थित होते. मोर्जे गावातील बुथचे नियोजन करून ते मतदारांशी संपर्क करीत आहेत.
