किसान मोर्चाच्या मालवण तालुका कार्यकारणीचा विस्तार

उपाध्यक्ष पदी प्रसाद भोजने, जयवंत परब यांची वर्णी: उर्वरीत पदाधिकाऱ्यांचीही नियुक्ती

मालवण ता.२८-:* किसान मोर्चा मालवणच्या तालुका कार्यकारणीचा विस्तार करण्यात आला आहे. तालुका उपाध्यक्ष पदी प्रसाद भोजने (कोळंब) आणि जयवंत परब (वायंगवडे कुळकरवाडी) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

किसान मोर्चाची बैठक येथील भाजपा कार्यालयात घेण्यात आली. यावेळी किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश सावंत, भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष महेश सारंग, माजी नगरसेवक दीपक पाटकर, किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष किशोर नरे, हडी सरपंच महेश मांजरेकर, निरोम सरपंच उमेश मांजरेकर आदी उपस्थित होते.

यावेळी निवडण्यात आलेल्या किसान मोर्चाच्या उर्वरित कार्यकारणी मध्ये सरचिटणीस पदी मिलिंद लोहार (डिकवल), दिगंबर जाधव (चिंदर), चिटणीस- सुहास सावंत (पळसंब), सल्लागार- प्रकाश साबा राणे (खोटले) यांचा समावेश आहे. भातपीक स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान सन २०२०-२१ मध्ये शासन स्तरावर घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय भात पीक स्पर्धेत वाघवणे देवलीतील भक्तप्रल्हाद चव्हाण यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर विश्वास आचरेकर (निरोम), श्रीराम परब (कांदळगाव) यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे यश मिळवले आहे. या विजेत्यांचा किसान मोर्चाच्या वतीने शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

You cannot copy content of this page