वेंगुर्ला प्रतिनिधी– वेंगुर्ला तालुक्यातून चालूवर्षीच्या आंबा हंगामात सर्व प्रथम हापूस आंबा वाशी मार्केटला पाठविण्याचा बहुमान शहरातील रामेश्वर आंबा सव्र्हिसला मिळाला आहे.
वेंगुर्ला तालुक्यातील म्हापण-कोचरा येथील आंबा बागायतदार शशिकांत अनंत केरकर यांच्या आंबा बागेतील ५ डझनी २ हापूस आंबा पेट्या २७ जानेवारी रोजी वेंगुर्ला गाडीअड्डा येथील जनार्दन पडवळ यांच्या रामेश्वर आंबा सव्र्हिस मधून नवी मुंबई-वाशी मार्केटला रवाना झाल्या.
