कोकण ट्रॅव्हल क्लबतर्फे स्वच्छता मोहिम

वेंगुर्ला प्रतिनिधी-कोकण ट्रॅव्हल क्लबच्यावतीने (केटीसी) प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शिरोडा-वेळागर येथे स्वच्छता मोहित राबविण्यात आली. यावेळी कोकण ट्रॅव्हलचे प्रतिक गावडे, निलेश चेंदवणकर, यासीर मकानदार, विशाल खाजणेकर यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

हा क्लब गेले वर्षभर कार्यरत आहे. कोकण ट्रॅव्हल क्लबच्या माध्यमातून देशभरातील बरेचसे पर्यटक आपल्या कोकणच्या सौंदर्याचा आस्वाद घेत आहेत. कोकणातील तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करण्याचे काम आणि भविष्यात कोकण ट्रॅव्हल क्लब कम्युनिटी तसेच कोकणातील उत्पादनांसाठी ऑनलाईन मार्केट उपलब्ध करुन देणे यासारखे अनेक संकल्प या क्लबद्वारा साकारले जातील. या संदर्भातील माहितीसाठी ८६६९८१०४८५ या नंबरवर संफ साधावा.

You cannot copy content of this page