वेंगुर्ला प्रतिनिधी- प्रतिवर्षाप्रमाणे श्री रामेश्वर कृपाप्रसादाने व सर्व भक्तमंडळींच्या सहकार्याने दि. २ ते ६ फेब्रुवारीपर्यंत वेंगुर्ला येथील रामेश्वर मंदिरात श्री गणेश जयंती, श्री देवी भगवती वर्धापनदिन, श्री देव नागनाथ व श्री शनिदेव वर्धापनदिन उत्सव साजरे होणार आहेत.
त्यानिमित्त दि. २ रोजी रोजी उत्सवास प्रारंभ, श्री रामेश्वर, नागेश्वर, शनी या देवतांवर लघुरुद्र व अभिषेक, श्री शनिदेव वर्धापनदिन, श्रीसत्यनारायणाची महापूजा, दि.३ रोजी श्री नागेश्वर वर्धापनदिन, वरदशंकर व्रतपूजा, नवचंडी देवता स्थापना व पाठवाचनास सुरुवात, दि.४ रोजी श्री गणेश जयंती, २१ गणपतींची स्थापना व २१ गणेशयाग (हवन) पूर्णाहूतीसह, सायं. ४ पासून स्त्रियांसाठी हळदीकुंकू, दि.५ रोजी श्री भगवती वर्धापनदिन उत्सव, नवचंडी हवनयुक्त, स. १० पासून कुंकूमार्चन, नवचंडी हवनाची पूर्णाहूती, सायंकाळी गणपती विसर्जन, दि. ६ रोजी १२ वा. बारापाच देवतांस महानैवेद्य, त्यानंतर आरती, गा-हाणे व सर्व भाविकांना महाप्रसाद देण्यात येईल
. उत्सव कालावधीत रात्रौ. ७.३० वा. तरंगदेवतांसहीत श्रीगणेश, श्रीभगवती, श्रीनागनाथ, श्रीदत्त महाराज यांची भजनासहीत पालखी मिरवणूक होईल. भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा, कार्यक्रमांचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री रामेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे केले आहे.
