Headlines

आम. नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर कणकवलीत बंदोबस्त

कणकवली 27 जानेवारी (प्रतिनिधी)-कणकवली येथील शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरणी आरोपी असलेले कणकवली विधानसभा मतदार संघाचे आम. नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन सुप्रीम कोर्टाने फेटाळल्यानंतर लागलीच कणकवली नरडवे नाका येथील शिवसेना शाखेसमोर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

कणकवली शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता पोलिसांनी घेतली असून दोन पोलीस अधिकाऱ्यांसह , राज्य राखीव दल तुकडी, दंगल नियंत्रण पथक तुकडी व अन्य पोलिसांचा बंदोबस्त शिवसेना शाखेसमोर तैनात ठेवण्यात आला आहे. हायकोर्टात आम.नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर शिवसेना शाखेसमोर फटाके फोडण्यात आले होते. आज सुप्रीम कोर्टाने नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने दक्षता घेतली आहे.

You cannot copy content of this page