*⚡मालवण ता.२७-:* जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा दांडी,मालवण या प्रशालेची विद्यार्थीनी कु.विधिशा रामचंद्र कुबल हीने पाचवी शिष्यवृत्ती मध्ये गुणवत्ता यादीत स्थान मिळवून यश संपादन केले. दांडी शाळा शिक्षकवृंद व शाळा व्यवस्थापन समिती मार्फत तिला गौरवचिन्ह, सन्मानपत्र व भेटवस्तु देऊन मुख्याध्यापिका सौ.विशाखा चव्हाण यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी राज्यपुरस्कार प्राप्त पदवीधर शिक्षक श्री.शिवराज सावंत, मार्गदर्शक शिक्षिका सौ.मनिषा ठाकुर, श्री.रामदास तांबे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.हेमंत चिंदरकर, उपाध्यक्ष पंकज धुरी, माजी अध्यक्ष श्री.मंगेश धुरी, सौ.सरोज लोणे, सौ.सुलभा खवणेकर, सौ.रेवंडकर, श्री.अनिल धुरी, सौ.रेवणकर, श्री.संजीव धुरी, श्री.सुमन लोणे, श्री.लिलाधर धुरी, श्री.गजानन कारंडे, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. यावेळी कु.विधिशा हिला सौ.मनिषा ठाकुर यांनी घड्याळ भेट दिले. यावेळी कु.विधिशा कुबल हीची आत्या सौ.सरोज लोणे यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
