वेंगुर्ला प्रतिनिधी– जागतिक अपंग दिनानिमित्त दिव्यांगांचा मेळावा पार पडला होता. यावेळी वेंगुर्ला भाजपातर्फे दिव्यांगांना ब्लँकेटचे वाटप केले होते. यात काही दिव्यांगांना ब्लँकेट मिळाली नव्हती, अशांना गावापर्यंत जाऊन त्यांना ब्लँकेट देण्यात येत आहेत. दरम्यान, मातोंड-पेंडूर येथील संतोषी माणगांवकर, मुकेश घोगळे, विजय परब, करिष्मा परब, शैलेश सावंत, प्रशांत शिरोडकर, गोकुळा कवठणकर या दिव्यांगांना तेथील कुलदेवता मंदिरात ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.
यावेळी मातोंड सोसायटीचे व्हाईस चेअरमन नारायण नाईक, उमेश दळवी, विजय नाईक, प्रकाश गावडे, मनोहर राऊत, आनंद शिरोडकर, शैलेश सावंत, प्रशांत घोगळे, भरत नेमण, सुनील गावडे यांच्यासह भाजपाचे प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर, बाबली वायंगणकर, दादा केळुसकर, मनवेल फर्नांडीस, संतोष गावडे उपस्थित होते. २९ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता साईदरबार हॉलमध्ये विश्व हिंदु परिषदेच्यावतीने अंधांना पांढ-या काठीचे वाटप करण्यात येणार माहिती प्रसन्ना देसाई यांनी दिली.
