*⚡कणकवली ता.२५-:* बदलत्या हवामानानुसार पिकांवर होणारा दुष्परिणाम,मोहोर गळ,रस शोषक किडींचा व रोगांचा होणारा प्रादुर्भाव साहजिकच त्यामुळे उत्पन्नात होणारी घट त्यासाठी आलेला मोहोर टिकवणे व त्याचा रोग व किडीपासून संरक्षण करण्यासाठी व शेतकऱ्यांमध्ये जनजागृती होण्यासाठी कणकवली तालुक्यातील बिडवाडी, कासारवाडी येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा(आत्मा)सन २०२१-२२अंतर्गत जिल्ह्यांतर्गत शेतकरी प्रशिक्षण या बाबी आंतर्गत आंबा व काजू मोहोर संरक्षण या विषयावर कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमात मंडळ कृषि अधिकारी श्रीम.गायत्री तेली यांनी शेतकऱ्यांना आंबा व काजू मोहोर संरक्षण संदर्भात पिकांवर कोणत्या वेळी कोणकोणती बुरशीनाशके व कीटकनाशकांची फवारणी करावी या संदर्भात सखोल मार्गदर्शन केले.तसेच आत्माचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक व्हि.एम.पाटील यांनी आत्मा आंतर्गत गट नोंदणी करणे, अन्नसुरक्षा गट योजना तसेच उद्योग प्रक्रिया या योजनेबाबत मार्गदर्शन केले.तसेच कृषी सहाय्यक श्रीम.ठाकूर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रस्तावना व आभार प्रदर्शन केले. सदर कार्यक्रमास शेतकऱ्यांचा उत्सूर्फपणे प्रतिसाद मिळाला. याप्रमाणे कणकवली तालुक्यातील नाडगिवे,सलिस्ते, वाघेरी, कुरंगवणे,नांदगाव, कोलोशी,नाटळ, दीगवले,सांगवे,कुंभवडे, कोंडिये, शिवडाव या गावात आंबा व काजू मोहोर संरक्षण या विषयावर कार्यक्रम घेण्यात आले. सदर कार्यक्रमात तालुका कृषी अधिकारी श्री.तोरणे ,शेतकरी सल्ला समिती अध्यक्ष वसंत तेंडुलकर,आत्माचे ए.टी.एम.श्री.पाटील ,मंडळ कृषी अधिकारी,कृषी पर्यवेक्षक,कृषी सहाय्यक,कृषी सेवक यांनी गावोगावी विशेष परिश्रम घेऊन कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन करून कार्यक्रम राबवित आहेत. त्यास शेतकऱ्यांचा उस्तूर्फपणे प्रतिसाद मिळत आहे.
