उपजिल्हा रूग्णालयात अंध, अपंगांना देण्यात आले दाखले

जीवनरक्षा प्रतिष्ठान अध्यक्ष राजू मसुरकर यांचे सहकार्य

*⚡सावंतवाडी ता.२५-:* सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय मध्ये आज अंध, अपंग, इत्यादी प्रवर्गातील व्यक्तीना दाखल देण्याचे काम आज मंगळवार दिनांक 25 डिसेंबर रोजी पार पडले. जिल्ह्यातील डॉक्टरांनी या ठिकाणी येऊन तपासणी करून सदरचे दाखले दिले आहेत. या तपासणी शिबिरासाठी जीवनरक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा काँग्रेस जिल्हा सरचिटणीस राजू मसुरकर यांनी सहकार्य केले आहे. यावेळी रूपा मुधळे, संजय पेडणेकर, रुपाली पाटील, रवी जाधव आदी समाजसेवक उपस्थित होते.

You cannot copy content of this page