आरोग्य विभागाची टीम स्वच्छ भारत सर्वेक्षणासाठी झाली सज्ज
⚡सावंतवाडी ता.२५-:* येथील शहरात सध्या स्वच्छ भारत सर्वेक्षण माझी वसुंधरा अभियानांतर्गत परिसर स्वच्छ करून मोकळ्या जागांची रंगरंगोटी केली जात आहे. यामुळे शहरातील मोकळ्या भिंती आता बोलक्या बनल्या आहेत. आरोग्य विभागाची टीम स्वच्छ भारत सर्वेक्षणासाठी सज्ज झाली आहे. शहरातील भिंती आता बोलक्या झाल्या असून त्या नागरिकांना अनेक स्वच्छतेचे संदेश देत आहेत.
ओला-सुका कचरा विलगीकरण, पर्यावरण संतुलन राखा असे विविध संदेश तसेच ओव्या या मोकळ्या भिंतीवर लिहिल्या गेल्या आहेत येथील शहरातील बसस्थानक, शाळा, महाविद्यालय परिसर आदी मोकळ्या जागांची रंगरंगोटी केली जात आहे. तसेच स्वच्छतेचे संदेश ध्यानी धरू, आरोग्य आपले निरोगी बनवू, मुलांना द्यावे एकच शिक्षण, वसुंधरेमुळे आपले रक्षण’ आदी पर्यावरण व स्वच्छताविषयक घोषवाक्य देखील भिंतीवर लिहिली गेलीत आहेत पक्षी, झाडे यांची बोलकी चित्रे तसेच वारली चित्र भिंतीवर झळकत असून रस्त्यावरून येणाऱ्या- जाणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत आहेत तर काही ठिकाणी पर्यावरण पूरक अशा संदेश देणाऱ्या सुशोभीकरणाच्या वस्तू ठेवण्यात आल्या आहेत.
