शासनाच्या निर्दयी धोरणाचा आम्ही धिक्कार करतो

कणकवली पेन्शनर्स असोसिएशन सभेत प्रा. महेंद्र नाटेकर यांचे प्रतिपादन

कणकवली ता.२५-: १९७२ नंतरच्या अप्रशिक्षित शिक्षकांकडून वयाच्या ५८ वर्षापर्यंत अध्यापन करुन घेतले , पण ते अप्रशिक्षित असल्याने त्यांना पेन्शन नाकारण्यात आली . हा या शिक्षकांवर अन्याय आहे . अध्यापनाचे काम इमानेइतबारे केले म्हणून त्यांना पेन्शन देणे अपरिहार्यच आहे . परंतु महाराष्ट्र शासनाने त्यांना पेन्शन देणे नाकारले आहे .

यासाठी महाराष्ट्र पेन्शनर्स संघटनेने हायकोर्टात दावा दाखल केला . हायकोर्टाने तात्काळ पेन्शन सुरु करण्याचे आदेश दिले . त्यावर महाराष्ट्र शासनने सुप्रिम कोर्टात अपील केले . सुप्रीम कोर्टाने अपील फेटाळून तात्काळ पेन्शन देण्याचे आदेश दिले तरीही महाराष्ट्र शासनाने त्याची कार्यवाही केली नाही म्हणून शासनाने सुप्रीम कोर्टाचेही आदेश जुमानले नाही . म्हणून अवमान याचिका महाराष्ट्र पेन्शनर्स संघटनेने दाखल केली आहे . महाराष्ट्र शासनाच्या ह्या निर्दयी धोरणाचा आम्ही पेन्शनर्स जाहीर निषेध करतो. असे प्रतिपादन प्रा. महेंद्र नाटेकर यांनी केले. कणकवली तालुका पेन्शनर्स असोसिएशनची मासिक सभा कोरोनाचे नियम पाळून आयोजित केली होती .

त्यावेळी अध्यक्ष पदावरुन प्रा . महेंद्र नाटेकर बोलत होते . यावेळी विश्वनाथ केरकर व्ही . के . चव्हाण , अशोक राणे , अरुण गणपत्ते , अनंत कदम , अनंत घोणे , मोहन सावंत , एम् . डी . परब , विद्याधर जोशी , बाबुराव भाऊ कांबळे , वृषाली विजय कुलकर्णी , सुधाकर अण्णा सावंत , इत्यादी उपस्थित होते . प्रा . नाटेकर पुढे म्हणाले आमदारांना एक लाख रुपये वेतन व पाच वर्षानंतर किमान पन्नास हजार पेन्शन दिली जाते . त्यांना कार खरेदी करण्यासाठी बीन व्याजी वीस लाख रुपये कर्ज दिले जातात . परंतु पवित्र ज्ञानदान करुन देश घडविणाऱ्या १९७२ नंतर अप्रशिक्षित शिक्षकांना जगण्यासाठी आवश्यक असलेली पेन्शन दिली जात नाही . ही गोष्ट छत्रपती शिवाजींच्या महाराष्ट्राला लाजिरवाणी आहे. तेव्हा १९७२ नंतरच्या सेवानिवृत्त शिक्षकांना तात्काळ पेन्शन सुरु करावी. २००५ नंतरच्या पेन्शनर्सना अंशदायी तुटपुंजी पेन्शन देतात . त्या पैशात आपला उदरनिर्वाह पेन्शनर्स करु शकत नाहीत . आणि म्हणून तात्काळ जुनीच पेन्शन तात्काळ मंजूर करुन त्वरित कार्यवाही करावी . दर महिन्याला जि.प. कर्मचाऱ्यांना पाच तारखेपर्यंत वेतन मिळते . त्यानंतर सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांना व त्यानंतर इतर पेन्शनर्स २० ते ३० तारखेपर्यंत मिळते . असा जेष्ठांचा दर महिन्याला सन्मान ( उध्दार ) केला जातो . ट्रेझरी एक तारखेलाच सर्वांना पेन्शन देते त्यानुसार एक तारखेलाच पेन्शन देते त्याप्रमाणे पेन्शनर्सना एक तारखेलाच पेन्शन द्यावी . ट्रेझरी मार्फतच शासनाचा पैसा घेऊन पेन्शनर्सना दिला जातो . त्याऐवजी ट्रेझरी मार्फतच जि . प . ची पेन्शनर्स पेन्शन देण्यात यावी . तरच पेन्शनर्स तथा जेष्ठ नागरिकांचा सन्मान होईल अन्यथा अपमान आहे. ८० वर्षात पदार्पण केल्याने अरुण गणपत्ते यांचा गुणगौरव करण्यात आला . त्यांनी संघटनेला त्यानिमित्त रु .५००० / – ची देणगी दिली . सहसेक्रेटरी व्ही . के . चव्हाण यांनी प्रोसिडिंग वाचन व जमाखर्च वाचून दाखविला त्यावर चर्चा करुन मंजुरी देण्यात आली . यावेळी बाबा नाडकर्णी व वसंत कलिंगण या कार्यकारिणीतील पेन्शनरांच्या दुःखद निधनाबद्दल त्यांच्या कार्याचा आढावा घेऊन भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली . शेवटी आभार प्रदर्शनाने सभेची सांगता करण्यात आली .

You cannot copy content of this page