पंचायत समिती उपसभापती शितल राऊळ यांचा टोला
*⚡सावंतवाडी ता.२५-:* तालुक्यासाठी मंजूर झालेल्या क्रीडा संकुलासाठी गेली १२ वर्ष जागा मिळत नव्हती. त्यावेळी बांदा येथे या क्रीडा संकुलासाठी १२ एकर जागा उपलब्ध करून दिली होती. यावेळी २०१८ साली क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी ७ ते ८ कोटी निधी दिला जाईल असे सांगितले होते. परंतु, आमदार दीपक केसरकर यांच्या हट्टापाई गेली अनेक वर्ष हे क्रीडा संकुल रखडून राहिले आहे. बांद्या या गावाला एकूण ३५ ते ४० ग्रामपंचायत जोडल्या आहेत. त्यामुळे या भागातील अनेक खेळाडूंना फायदा होणार आहे. त्यामुळे आमदार दीपक केसरकर यांनी बांदा येथे होणाऱ्या क्रीडा संकुलासाठी आडकाठी घालू नये. आमदार दीपक केसरकर हे ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी केवळ घोषणा करतात. प्रत्यक्षात काहीही करत नसल्याची टीका केली आहे.
