*⚡कणकवली ता.२२-: जानेवारी महीना म्हटला की महीला मंडळी आतुरतेने वाट पाहत असतात ती म्हणजे मकर संक्रांतीची. या मकरसंक्रांतीपासून हळदीकुंकू समारंभ प्रारंभ होत असतो वैयक्तिक घरगुती तर वाडी वाडीत सार्वजनिक महीला मंडळातर्फे हळदीकुंकू समारंभ असतात . महीला मंडळी ही यात मोठ्या हौसेने सामिल होत असतात .
असेच काहीसे आगळे वेगळे हळदीकुंकू तेही घरगुती कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील नांदगावचे माजी सरपंच पंढरीनाथ पारकर यांच्या एकत्रित कुटुंबांनी सर्व महिला वर्गाला हळदीकुंकू वाण म्हणून सुपारी झाडे वाटत नैसर्गिक ठेवा जपत आहेत.गेले चार वर्षे हे पारकर कुटुंबातील असे झाड वाटप करुन हळदीकुंकू समारंभ साजरा करीत आहेत. हे खरोखरच कौतुकास्पद बाब म्हणावी लागेल.
