जिल्हा कबड्डी असोसिएशन आयोजित कबड्डी निवड चाचणी स्पर्धा;सरस्वती विद्यामंदिर कुडासे येथे संपन्न
दोडामार्ग ता.१० सुमित दळवी-: जिल्हा कबड्डी असोसिएशन व तालुका कबड्डी असोसिएशन यांच्या विद्यमाने कुमार व कुमारी निवड चाचणी स्पर्धा सरस्वती विदयामंदिर कुडासे येथे संपन्न झाली.या स्पर्धेत कुमार गटात पवनपुत्र झरेबांबर तर कुमारी गटात स्वराज्य दोडामार्ग यांनी अजिंक्यपद पटकाविले.
सिंधुदुर्ग फेडरेशन ची कुमार गटाची होणारी निवड चाचणी साठी यावेळी दोडामार्ग तालुक्याचा कुमार कुमारी संघ निवडण्यात आला .कुडासे प्रशालेचे मुख्याध्यापक एस.एस.पाटील क्रीडा शिक्षक सोमनाथ गोंधळी सर यांचे उत्तम नियोजन आणि व्यवस्थापन हे यावेळी वैशिष्ट्य पूर्ण ठरले.उपस्थित खेळाडूंना आणि प्रेक्षकांना उत्तम जेवणाची सोय या वेळी करण्यात आली होती.
स्पर्धेदरम्यान दोडामार्ग कबड्डी असोसिएशन चे अध्यक्ष सूचन कोरगावकर, सचिव विजयकुमार साळुंखे आणि खजिनदार संदीप गवस ,सामाजिक कार्यकर्ते दादा देसाई , उदय गवस, प्रकाश कुडासकर,पत्रकार प्रमोद गवस,गोविंद शिरसाठ यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. सदर निवड चाचणी मध्ये एकूण आठ संघांनी सहभाग घेतला होता .स्पर्धेचे निरीक्षक म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा फेडरेशन सदस्य प्रदीप गावडे ,स्पर्धा पंच प्रमुख म्हणून श्री जनार्दन पाटील यांनी ,पंच म्हणून अनिल आडे, मयूर पताडे ,स्वप्नील महाले,यशवंत गवस,संतोषी करमळकर ,पूजा पाटील यांनी काम पाहिले .तर संपूर्ण स्पर्धेचे सूत्र संचालन पत्रकार आणि कबड्डी प्रेमी सुमित दळवी यांनी केले. निवड झालेल्या संघांचे सराव शिबीर कुडासे प्रशालेच्या मैदावर पार पडणार असल्याची माहिती अध्यक्ष सूचन कोरगावकर यांनी सांगितले आहे.
