*⚡सावंतवाडी ता.१०-: सावंतवाडी ते कालिका मंदिर कारीवडे एस. टी. बससेवा शुक्रवार पासून विद्यार्थी व प्रवाशांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आली आहे. सकाळी 6.45 व दुपारी 12.30 अशा दोन बस सावंतवाडी आगारातून सोडण्यात येणार आहेत. यावेळी या बसचे चालक व वाहक यांचे गावचे तंटामुक्ती अध्यक्ष तथा माजी सरपंच लक्ष्मण गावकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सावंतवाडी पोलिस उपनिरीक्षक जयराम पाटील व त्यांचे सहकारी उपस्थित होते. यांचेही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी मनोहर गुरव, उमेश गावकर, शंकर परब, प्रकाश नाईक, उपस्थित होते. याप्रसंगी लक्ष्मण गावकर यांनी श्री देवी कालिकामाते समोर एस्टी. कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य होऊन महाराष्ट्रातील एस्टी सेवा लवकरात लवकर सुरू व्हाव्यात असे साकडे घातले.
