श्री देव दांडेश्वराचा जत्रोत्सव उत्साहात साजरा

*⚡मालवण ता ०९-: रंगीबेरंगी पताक्यांची सजावट आणि विद्युत रोषणाईने सजलेले मंदिर… भाविकांच्या उपस्थितीने फुलून गेलेली किनारपट्टी… मच्छीमारांकडून होणारा श्री देव दांडेश्वराचा जयघोष… अशा उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करीत मालवण दांडी येथील श्री देव दांडेश्वराचा जत्रोत्सव साजरा झाला. मालवण दांडी येथील देव दांडेश्वराचा वार्षिक जत्रोत्सवाला आज सकाळपासून प्रारंभ झाला. सकाळी ८ वा. श्री देव दांडेश्वराच्या मूर्तीवर विधिवत दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानंतर सकाळी श्री सत्यनारायणाची महापूजा पार पडली.

या पूजेनंतर येणाऱ्या भाविकांना सोशल डिस्टिंग पाळून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. श्री देव दांडेश्वराच्या दर्शनासाठी दिवसभर भाविकांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने रांगा लावल्या होत्या. यावेळी उपस्थितांनी श्री देव दांडेश्वराचे नवस फेडले आणि बोलले. या जत्रोत्सवानिमित्त दांडी किनाऱ्यावर खेळणी, खाद्यपदार्थ आदी विविधप्रकारची दुकाने व स्टॉल थाटण्यात आले होते. अत्यंत नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध पध्दतीने हा जत्रोत्सव पार पडला.

You cannot copy content of this page