विद्यार्थ्यांनी संस्कृत भाषा शिकावी:आरती पवार

कणकवली नगरवाचनालयाच्या संस्कृत कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

*⚡कणकवली ता.०९-:* संस्कृत ही जगातील प्राचीनतम भाषा आहे. तिचा अभ्यास अनेक भाषांच्या अभ्यासाला पूरक ठरतो. त्यामुळे ही भाषा विद्यार्थ्यांनी अवगत करावी, असे आवाहन संस्कृत शिक्षिका आरती पवार यांनी केले.

नगरवाचनालय कणकवली यांच्यावतीने संस्कृत व्याकरण कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत त्या बोलत होत्या. यावेळी विनय पवार, वाचनालयाचे कार्यवाह हनीफ पीरखान, वाचनालयाचे कार्यकारिणी सदस्य डी.पी.तानवडे, पी. जे. कांबळे, वैजयंती करंदीकर, डॉ. विनायक करंदीकर, शिक्षक मकरंद आपटे, शिक्षिका तनश्री डिचोलकर, वाचनालय कर्मचारी राजन ठाकूर, स्नेहा चव्हाण, विद्यार्थी प्रतिनिधी श्रेया पाटकर, ओम पारकर आदीसह पदाधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

आरती पवार यांनी संस्कृत भाषेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व व्याकरणाचा व्यासंग याचा प्रभावही पडला. तसेच क्रियापदांचे काळ व अर्थ याची रुपे, नामे, सर्वनामे, धातूसहित विशेषणे, अव्यये, संधी, समास याची संपूर्ण माहिती त्यांनी विद्यार्थ्यांनी दिली. प्रयोग, समाप्तीरचना, संख्यावाचक, क्रमवाचक, आवृत्तीवाचक, शब्द याची माहिती विवेचनात अंर्तभूत होती. संस्कृत भाषा सहज बोलण्याचा, उच्चारण्याचा आगळा वेगळा व सोप्या शब्दातील अनुभव विद्यार्थ्यांना मिळाला. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी देखील आपल्या शंकाकुशंका विचारत उत्तरे जाणून घेतली. या कार्यशाळेचे प्रास्ताविक महमद हनीफ आदम पिरखान केले. सूत्रसंचालन डी. पी. तानवडे यांनी केले. विशेष म्हणजे ही कार्यशाळा कोरोना बाबतचे नियम पाळून घेण्यात आली.

You cannot copy content of this page