सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील आगामी काळात होणाऱ्या अर्बन बँक निवडणूकीच्या रिंगणात भाजपचे जिल्हा प्रवक्ते तथा सावंतवाडीचे मा. नगराध्यक्ष संजू परब मैदानात उतणार आहेत. आगामी काळात होणाऱ्या या निवडणुकीत पॅनल उभं करणारं आहे. अर्बन बँकच्या १९ संचालकपदावर उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा संजू परब यांनी केली आहे. तर अर्बन बँक ताब्यात घेणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, या अर्बन बँकेवर गेली १५ वर्ष माजी राज्यमंत्री आ. दीपक केसरकर यांची सत्ता असून सावंतवाडी नगरषरिदेनंतर आता अर्बन बँकेत आ. केसरकरांना धक्का देण्यासाठी संजू परब यांनी मनसुबे रचले आहेत. त्यामुळे सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत ‘अर्बन’चाही धुरळा उडणार आहे.
अर्बन बँक निवडणूकीच्या रिंगणात सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब उतणार मैदानात
