शिरगाव येथील श्री पावणाई देवीचा १३ रोजी हरिनाम सप्ताह

*⚡देवगड ता.०८-: माहेरवाशीनींच्या हाकेला धावणारी व भक्ताला दिलेल्या वचनाला जागणारी असा नावलौकीक असलेल्या देवगड तालुक्यातील शिरगांव गांवचे जागृतग्रामदैवत श्री पावणाई देवीचा सात प्रहरांचा अखंड हरिनाम सप्ताह गुरुवार १३ जानेवारी रोजी शासकीय कोरोना नियमावलीचे पालन करून पारंपारिक रितीरिवाजाप्रमाणे भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात येणार आहे.  

देवगड-निपाणी राज्यमार्गावर शिरगांव गांवचे ग्रामदैवत श्री पावणाई देवीचे सुरेख देवालय आहे. पौष महिन्याच्या पुत्रदा एकादशी दिवशी या देवालयात थाटामाटात साजरा होणाऱ्या  हरिनाम सप्ताहास दूर दूर वरून नोकरी व्यवसायानिमित्त बाहेरगावी असलेले चाकरमानी, माहेरवाशिनी कृपाआशीर्वादासाठी शिरगांव येथे येतात. जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील व्यापारी, महिला बचतगट छोटेखानी दुकाने थाटतात. या हरिनाम सप्ताहास भाविकांनी, भजनी मंडळीनी उपस्थित राहून हरिनामाची शोभा वाढवावी असे आवाहन श्री पावणादेवी देवालय विश्वस्त मंडळ, बारा पाच मानकरी, ग्रामस्थ मंडळी यांनी केले आहे.

You cannot copy content of this page