आमदार स्थानिक विकास निधीतून मंजूर झालेल्या विकास कामांचा शुभारंभ…

सबनीस वाडा येथील पायऱ्यांवर रेलिंग बसवण्याच्या कामाचा वासंती पुरोहित यांनी श्रीफळ वाढवून केला शुभारंभ…

सावंतवाडी ता ०८-: माजी गृहराज्यमंत्री आणि आमदार दीपक केसरकर यांच्या स्थानिक विकास निधीतून विविध विकास कामे मंजूर झाली असून सबनीसवाडा येथे असणाऱ्या पायऱ्यांवर रेलिंग बसवण्याच्या कामाचा शुभारंभ स्थानिक ज्येष्ठ नागरिक वासंती पुरोहित यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.

यावेळी शिवसेना माजी नगरसेवीका दिपाली सावंत, उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार, युवा सेनेचे विशाल सावंत, दत्‍ताराम सावंत, सुनील सावंत, पत्रकार शिवप्रसाद देसाई, विश्वास घाग, बंड्या नेरूरकर, रेश्‍मा मालवणकर, मधुकर धोंड, प्रसाद सोईल, शाबिना डान्टस आदी नागरिक उपस्थित होते

You cannot copy content of this page