*⚡बांदा ता.०८- भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांचे उद्या, रविवारी बांदा येथे आगमन होणार आहे. यानिमित्त त्यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंधुदुर्ग ज़िल्हा भाजपा युवा मोर्चातर्फेे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी १० वाजता विक्रांत जी पाटील यांचे आगमन व स्वागत, साडेदहा वाजता राज्य सरकारनेने लागू केलेल्या विद्यापीठ सुधारणा विधेयकाला विरोध करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजपा युवा मोर्चा सिंधुदुर्गतर्फे एक हजार पोस्ट कार्ड पाठविण्याचा लक्षवेधी कार्यक्रम, ११ वाजता बांदा येथील श्री देव बांदेश्वर मंदिर येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी पूजनाचा कार्यक्रम होणार आहे.
ह्या सर्व कार्यक्रमांना भाजपा युवा मोर्चा जिल्हा पदाधिकारी, सर्व तालुका अध्यक्ष, सर्व तालुका कार्यकारणी सदस्य यांनी मोठ्या संख्येने बांदा कॉर्नर येथे उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष आनंद सावंत यांनी केले आहे.
