*⚡सावंतवाडी ता.०८-:मळेवाड येथील श्री गजानन महाराज पतित पावन भक्ती मंदिर येथे संगीत क्षेत्रातील जाणकार संगीत विशारद सुनील पाडगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत शाळेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी भाई रेडकर, सुनील गोवेकर, प्रसाद पाटणकर, संजय मोरजकर, मदन मुरकर, संतोष नाईक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
संगीत क्षेत्राची मुलांना गोडी लागावी तसेच संगीताचा प्रसार व्हावा व भावी पिढीला संगीताची गोडी लागावी, संगीत क्षेत्रामध्ये शास्त्रीय गायन वादन याचा मुलांना अनुभव यावा यासाठी मळेवाड येथे संगीत विशारद सुनील पाडगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही संगीत शाळा सुरू करण्यात आली. ज्यांना संगीत शिकण्याची इच्छा असेल त्या मुलांनी पतित पावन भक्ति मंदिर मळेवाड येथे संपर्क साधावा, असे आवाहनही सुनील पाडगावकर यांनी केले आहे.
