*⚡कणकवली ता.०७-:* महाराष्ट्र सरकारमध्ये विलगीकरण करा,या मागणीसाठी दोन महिने कर्मचारी संपावर आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात एसटी प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे.तब्बल २१ एसटी कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले असल्याची माहिती विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी दिली.
कणकवली -७ ,सावंतवाडी-३,कुडाळ -३,मालवण -३ अशा फेऱ्या महामंडळाने चालू ठेवण्यात आले आहेत. एसटी महामंडळाने नव्याने अजून वीस कर्मचाऱ्यांना बडतर्फ का करू नये अशा नोटिसा देखील बजावल्या आहेत.
