सावंतवाडी नगर पालिकेचा उपक्रम;चार्जिंग स्टेशन उभरणारी जिल्ह्यातील पहिलीच नगरपालिका
*⚡सावंतवाडी ता.०७ प्रसन्न गोंदावळे-: माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत शहरातील जगन्नाथ भोसले उद्यानासमोर 2 चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहेत. त्यामुळे आता शहरातील विद्युत वाहनांकरिता चार्जिंग करणे सोयीचे होणार आहे. या 2 चार्जिंग स्टेशन द्वारे एका वेळेस 8 विद्युत वाहने चार्ज होणार आहेत. याबाबतची माहिती आरोग्य विभागाचे अधिकारी श्री. नाटेकर यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, माझी वसुंधरा अंतर्गत शहरातील जनतेमध्ये विद्युत वाहनाबाबत जनजागृती व्हावी यासाठी दोन चार्जिंग स्टेशन उभारण्यात आली असून, संपूर्ण सिंधुदुर्गात सर्वात प्रथम चार्जिंग स्टेशन उभी करणारी सावंतवाडी ही पहिली नगरपालिका ठरली आहे. इंधनाच्या गाड्या वापरल्याने होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी जास्तीत जास्त नगरिकानी विद्युत वाहन वापरावीत असे आवाहन याद्वारे पालिकेने केले आहे.
