कुडाळ नगरपंचायत निवडणुकीतील भाजपच्या उमेदवाराचा मृत्यू

*⚡कुडाळ ता.०७-: प्रचार आटोपून परतत असताना कुडाळ नगरपंचायत निवडणुकीतील भाजपचे उमेदवार सुधीर अनंत चव्हाण यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले आहे. ही धक्कादायक घटना काल, गुरूवारी रात्री साडेअकरा वाजता घडली. सुधीर चव्हाण हे कुडाळ नगरपंचायतची निवडणूक भाजपच्या तिकिटावर प्रभाग १६ मधून लढवत होते. गुरूवारी रात्री ११.३० वाजता आपल्या प्रभागातील प्रचार आटपून ते कुडाळ येथील भाजपच्या कार्यालयात आले. यानंतर ते एका ठिकाणी जायला गेले. तेथे पोहचल्यावर लगेचच त्यांना ह्रदय विकाराचा तीव्र धक्का आला आणि ते खाली कोसळले.

खाजगी रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले. पण डाॅक्टरानी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, छोटा मुलगा, आई असा मोठा परिवार आहे.ते कुडाळमधील डाॅक्टर बाणवलीकर यांच्या यांना कृत्रिम दात पुरवठा करण्याचा त्यांचा व्यवसाय होता. सुधीर हे मुळचे मालवणचे होते. पण गेली कित्येक वर्षं ते कुडाळात व्यवसायानिमित्त स्थायिक झाले होते. ते क्रिकेट अप्रतिम खेळायचे. त्यामुळे कुडाळात त्यांचा मोठा मित्र परिवार होता. कुडाळातील लोकांशी आणी मित्र परिवारांशी त्यांची नाळ जुळलेली होती. त्यांचा मृतदेह कुडाळातील रूग्णालयात ठेवण्यात आला आहे. सकाळीच शवविच्छेदन करून नंतर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. सुधीर चव्हाण यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबातील लोकांवर मोठे संकट उभ राहिल असून त्यांच्या मित्रपरिवाराला मोठा धक्का बसला आहे.

You cannot copy content of this page