फुगे विक्रेत्यांना केले खाऊ, जेवण व कपडे वाटप;तलावाकाठी पोट भरण्यासाठी सुरू असलेली तळमळ पाहून कॉलेज युवकांचे मन हेलावले
⚡सावंतवाडी ता.०६-: येथील तलावाकाठी फुगे खेळणी विक्रीसाठी आलेले परप्रांतीय लहान मुलापासून ते म्हाताऱ्यांची पोट भरण्यासाठी चालू असलेली तळमळ पाहून शहरातील काही कॉलेज युवकांनी एकत्र येत त्यांना बिस्किट कपडे जेवण यांचे वाटप केले.एवढ्या लहान वयात या कॉलेज युवकांनी केलेल्या समाजकार्याबद्दल समाजातून त्यांचे कौतुक होत आहे.
यावेळी रोशन गावडे, ओमकार नेरुरकर, मयुरेश मलिक, ओजस नाईक, कौस्तुभ नाईक, यश गावडे, आशय डोहपेश्वरकर, यश ठाकूर, समीर धुरी, भूषण धुरी आदी युवक उपस्थित होते
दरवर्षी अनेक परप्रांतीय व्यापारी शहरात डिसेंबर महिन्यात पोट भरण्याची येतात मात्र कोरोणामुळे गेली 2 वर्ष नंतर ह्या वर्षी कोरोनाचा धोका कमी झाल्याने हे परप्रांतीय लोक चिमुकल्या लहान मुलांसह गेल्या डिसेंबर महिन्यात दाखल झाले असून ते क्रिसमस सणानिमित्त लागणारे साहित्य, त्यानंतर आता फुगे खेळणी विकून लहान मुलांपासून म्हाताऱ्यांपर्यंत ऊन थंडीत व्यवसाय करत आहेत तर त्यांची काही वर्षे भराची लहान चिमुकली देखील कपड्यावीना थंडीतच वावरत आहेत ही बाब शहरातील ह्या युवकांच्या निदर्शनास येताच त्यांनी एकत्र येत आपल्या पॉकेट मणीतून त्या गरीब परप्रांतीयांना मदत करण्याचे ठरवले त्यानुसार काल रात्री त्या युवकांनी बिस्कीट, कपडे, जेवण यांचे वाटप केले तर ह्या पुढे देखील आपल्याकडून जमेल तेवढि मदत केली जाईल अशी ग्वाही त्या कॉलेज युवकांनी दिली
