ह्यूमन राईट फाॅर प्रोटेक्शनचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष नाईक यांची मागणी
*⚡कणकवली ता.०६-: कणकवली येथील गडनदी वरील सर्व केटी बांधणाऱ्यामध्ये लोखंडी प्लेट्स किंवा लाकडी फळ्या टाकून पाणी अडविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी ह्यूमन राईट फाॅर प्रोटेक्शनचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष नाईक यांनी केली आहे.
सध्या उन्हाच्या झळा वाढू लागल्या असून उन्हाळ्यात संभाव्य पाण्याची टंचाई भासू नये.यासाठी पाणी आडवा पाणी जीरवा ही मोहीम अधिक व्यापकपणे राबविण्याची आवश्यकता आहे.कणकवली गडनदी वरील कनकनगर तसेच आचरेकर प्रतिष्ठान नजीक असलेल्या केटी बांधणाऱ्यामध्ये तातडीने प्लेट्स टाकून पाणी अडविण्यात यावे.तसेच या नदीच्या मार्गावरील अन्य गावांमध्ये बांधलेल्या केटी बंधाऱ्यांमध्ये पाणी अडविण्याची मोहीम राबवली पाहिजे.त्यामुळे दिवसेंदिवस खालावत चाललेली नदी पात्राची पाण्याची पातळी वाढवण्यासाठी मदत होईल.तसेच जमिनीतील भूगर्भातील पाण्याची पातळी वाढेल.विहिरींच्यादेखील पाणी पातळीत वाढ होईल.गुरे जनावरे,पाळीव प्राणी,जंगली प्राणी यांचीदेखील पाण्याअभावी परवड होणार नाही.त्याचबरोबर नदी काठच्या गावांना उन्हाळी भाजीपाला व इतर पिकांसाठी मुबलक पाणी उपलब्ध होण्यासाठी मदत होईल.
यासाठी गडनदी वरील सर्व केटी बांधणाऱ्यावरती प्लेट्स टाकून पाणी अडविण्याची मोहीम संबधीतांनी राबवावी अशी आग्रही मागणी ह्यूमन राईट फाॅर प्रोटेक्शनचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष नाईक यांनी केली आहे.
