वेंगुर्ला प्रतिनिधी– अश्वमेध तुळस महोत्सवांतर्गत माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त ‘सुशासन दिनाच्या‘ औचित्याने आयोजित केलेल्या खुल्या चित्रकला व रंगभरण स्पर्धेत जिल्ह्यातील २५०हून जास्त चित्रकारांनी सहभाग घेतला.
गटनिहाय निकाल प्रथम तीन पुढीलप्रमाणे- रंगभरण स्पर्धा- बालवाडी-दिशम परब, स्वरुपा मराठे, विहान शेलार, १ली ते २री-मयुरेश हवालदार (नेमळे), सानवी चुडजी (तुळस), साही नाईक (परबवाडा), चित्रकला स्पर्धा- ३री ते ४थी-अश्विन सनसुरकर (वजराठ), रामचंद्र मांजरेकर (तुळस), पायल नेरुरकर (वेंगुर्ला), दर्श राणे, ५वी ते ७वी-विठ्ठल कोरगांवकर (वेंगुर्ला), प्रिया देसाई (सावंतवाडी), उमेश मेस्त्री (वजराठ), ८वी ते १०वी-विष्णू आरोलकर (दाभोली), पूर्वा चांदरकर (नेमळे), दिशा पालकर (अणसूर). स्पर्धेचे परीक्षण कला शिक्षक अनिल परुळकर यांनी केले.
स्पर्धेचे उद्घाटन सरपंच शंकर घारे व भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी जैतिराश्रित संस्था मुंबईचे अध्यक्ष अॅड.प्रभानंद सावंत, उपाध्यक्ष विष्णू परब, कार्यवाह बन्सी चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य जयवंत तुळसकर, सदस्या शितल नाईक, प्रतिष्ठान अध्यक्ष विवेक तिरोडकर, उपाध्यक्ष प्रदिप परुळकर, प्रा.सचिन परुळकर, निवृत्त पोलीस सुधीर चुडजी, शैलजा परुळकर, अॅड.मनिष सातार्डेकर, संजय परब, जीजी सावंत, संदीप पेडणेकर आदी मान्यवर उपस्थित होते. वेताळ प्रतिष्ठानला प्रसन्ना देसाई यांनी अटल बिहारी वाजपेयी यांची प्रतिमा भेट दिली.
सचिव गुरुदास तिरोडकर यांनी सूत्रसंचालन तर रोहन राऊळ यांनी आभार मानले. स्पर्धा यशस्वीतेसाठी महेश राऊळ, सद्गुरु सावंत, मंगेश सावंत, माधव तुळसकर, किरण राऊळ, सदाशिव सावंत, हेमलता राऊळ, हेमंत सोकटे, वैभवी सोकटे, सानिया वराडकर यांनी परिश्रम घेतले.
