नगरवाचनालयास अटलीजींच्या पुस्तकांची भेट

वेंगुर्ला प्रतिनिधी– प्रदेश भाजपाच्यावतीने सुशासन दिनानिमित्त अटलींची पुस्तके वाचनालयास भेट द्यावी असे आवाहन केले होते. त्यानुसार वेंगुर्ला भाजपातर्फे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरद चव्हाण यांच्या हस्ते वेंगुर्ला नगरवाचनालयास अटलींच्या पुस्तकांचा संच भेट देण्यात आला.

या पुस्तकांचा संच नगरवाचनालयाचे कार्यवाह कैवल्य पवार यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी भाजपाचे प्रसन्ना देसाई, दिलीप गिरप, सुहास गवंडळकर, स्मिता दामले, शितल आंगचेकर, प्रशांत खानोलकर, दादा केळुसकर, प्रशांत आपटे, साक्षी पेडणेकर, श्रेया मयेकर, कृपा गिरप, पूनम जाधव, लक्ष्मीकांत कर्पे, प्रसाद पाटकर, विजय बागकर, शेखर काणेकर, नितिश कुडतरकर, रसिका मठकर व नगरवाचनालयाचे गुरुदास मळीक उपस्थित होते.

You cannot copy content of this page