वार्षिक पारितोषिक वितरण संपन्न

*⚡वेंगुर्ला ता.२७-:* मठ हायस्कूलचे संस्थापक रायसाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर यांची जयंती आणि वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ डॉ.रामजी खानोलकर यांच्या जयंती दिनी २४ डिसेंबर रोजी पार पडला.

हायस्कूलमधील श्रावणी धुरी, दीपिका परुळेकर, निधी मठकर, प्रणव सकपाळ, मेघस्वी भगत, रसिका ठाकुर, ईशा ठाकुर, मयुरेश मांजरेकर, श्रेया परब यांनी आपल्या भाषणात डॉ.रामजी खानोलकर यांच्या जीवन प्रवासाची ओळख करून दिली. त्यानंतर इयत्ता ८ वी ते १० वी वर्गातून प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण तसेच प्रकट वाचन, निबंध, वक्तृत्व, काव्यवाचन, घोषवाक्य, प्रश्नमंजुषा या शालेय अंतर्गत स्पर्धांमधील विजेत्यांना प्रमुख अतिथी मंदार कामत यांनी पुरस्कृत केलेली रोख पारितोषिके देवून गौरविण्यात आले.

यावेळी सरपंच तुळशीदास ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते मंदार कामत, मुख्याध्यापक एस.ए.जाधव, डॉ. रामजी धोंडजी खानोलकर घराण्यातील मिलिद खानोलकर, नूतन मराठा हितवर्धक संघाचे प्रकाश मठकर, शिक्षक-पालक संघाचे उपाध्यक्ष वसंत परूळेकर, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा वैभवी गावडे, उल्हास मठकर, ग्रामपंचायत सदस्या परब, पालक, शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जी.एम.गोसावी यांनी प्रास्ताविक, साक्षी वराडकर यांनी पारितोषिक वितरण वाचन तर तेजल खानोलकर यांनी आभार मानले.

You cannot copy content of this page