राज्य व्हॉलिबॉल स्पर्धेत बॅ.खर्डेकरच्या विद्यार्थ्यांचे यश

*⚡वेंगुर्ला ता.२७-:* महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनच्या मान्यतेने दि.११ डिसेंबर रोजी कोल्हापूर (सांगली, कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग) विभागीय निवड चाचणीमध्ये बॅ.खर्डेकर कॉलेजचे १२ वी विज्ञान शाखेतील कु.हर्ष किरण बोवलेकर व कु.ओंकार अनंत गोसावी यांची चंद्रपूर येथे होणा-या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली होती.

दरम्यान, राज्यस्तरीय स्पर्धेत कोल्हापूर विभाग उपविजेता ठरला. या कामगिरीबद्दल प्राचार्य विलास देऊलकर व पर्यवेक्षक डी.जी.शितोळे यांच्या हस्ते मुलांचा सन्मान करण्यात आला. तसेच सिंधुदुर्ग व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष विलास गावडे व सेक्रेटरी निलेश चमणकर यांनीही अभिनंदन केले.

You cannot copy content of this page