वेंगुर्ला प्रतिनिधी– माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त वेंगुर्ला भाजपातर्फे विवीध कार्यक्रमाचे आयोजन करुन ‘सुशासन दिवस‘ साजरा करण्यात आला. याचाच एक भाग म्हणून वेंगुर्ला नगरपरिषदेचे यशस्वी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांना प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरद चव्हाण यांच्या हस्ते ‘सुशासन अटल पुरस्कार‘ प्रदान करण्यात आला.
वेंगुर्ला तालुका भाजपाच्या कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांच्यासह भाजपाचे सुहास गवंडळकर, शितल आंगचेकर, स्मिता दामले, सोमनाथ टोमके, प्रशांत आपटे, साक्षी पेडणेकर, श्रेया मयेकर, पूनम जाधव, कृपा मोंडकर, दादा केळुसकर, पूजा कर्पे, प्रशांत खानोलकर, बाळा सावंत, लक्ष्मीकांत कर्पे, मनवेल फर्नांडीस, निलेश मांजरेकर, तुषार साळगांवकर, वृंदा गवंडळकर, रसिका मठकर, अब्दुल रेहमान शेख, शेखर काणेकर, नितीश कुडतकर, ओंकार चव्हाण, नारायण गावडे आदी उपस्थित होते.
अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त साज-या होत असलेल्या उत्तम प्रशासन दिनानिमीत्त स्वतंत्र भारतात उत्कृष्ट प्रशासन विषयक उपायांचे संख्यात्मकीकरण करताना त्यांनी निभावलेल्या उल्लेखनीय भुमीकेवर प्रकाश टाकणे गरजेचे असल्याचे मत पूजा कर्पे यांनी व्यक्त केले.
