वेंगुर्ल्यातील तरुणाचा मदतीचा हात
वेंगुर्ला प्रतिनिधी- सध्या राज्यभर जोरदार कडाक्याची थंडी असून सर्वचजण गारठले आहेत. थंडीपासून दिलासा मिळण्यासाठी शेकोटी, उबदार स्वेटर, चादर, कानटोपी यांचा वापर करताना दिसत आहेत. मात्र, जे अनाथ आहेत, जे बाहेर घराच्या छायेपासून लांब आहेत अशांना थंडीपासून वाचण्यासाठी ह्यापैकी काही मिळत नसल्याने त्याच स्थितीत ते थंडीत कुडकुडत झोपत आहेत. याचीच जाणीव ठेवत वेंगुर्ल्यातील एका तरुणाने स्व-खर्चातून नवीन ब्लँकेट खरेदी करुन अशा निराधार व बाहेर झोपणा-या वेंगुर्ला शहरातील काही वृद्ध पुरुष व महिलांना ब्लँकेट देवून मदतीचा प्रयत्न केला आहे.
वेंगुर्ला-आनंदवाडी येथील हर्षल चंद्रकांत जाधव या तरुणाने स्व खर्चातून बाहेर झोपणा-या व फिरणा-या माणसांना रात्रीच्यावेळी जाऊन नवीन ब्लँकेट देवून त्यांना थंडीपासून वाचण्यासाठी मतदतीचा हात दिला आहे. ज्या लोकांना कोणीही नातेवाईक नाहीत किंवा जे रस्त्यावर बाहेर झोपतात त्यांना सामाजिक भान असलेल्या व्यक्तिनी अशा निराधार वयोवृध्द माणसांसाठी पुढे येऊन मदत करावी असे आवाहन केले आहे.
