अनधिकृत वाळू उत्खनन प्रकरणातील सहा संशयितांना सशर्त जामीन

*⚡मालवण ता.२५-:* मालवण तालुक्यातील काळसे येथील कर्ली खाडीपात्रातील शासनाच्या मालकीच्या वाळूचे उत्खनन करून त्याची चोरी केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या काळसे बागवाडी येथील सहा संशयितांची जिल्हा व सत्र न्यायाधीश, ओरोस यांनी प्रत्येकी २५ हजारांच्या सशर्त जामीनावर मुक्तता केली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपींतर्फे ॲड. स्वरुप पई व ॲड. अंबरीश गावडे यांनी काम पाहिले.

काळसे बागवाडी येथील रामकृष्ण व्यंकटेश खोत यांनी २९ नोव्हेंबर रोजी दिलेल्या तक्रारी नुसार उदय सुधाकर नार्वेकर, विनोद गोपाळ नार्वेकर, सुदेश सुनील कोरगावकर, जयवंत मधुकर खोत, शाहु वाघु वरक, आणि सखाराम वामन आचरेकर (सर्व रा. काळसे ता. मालवण) तसेच अमृत सुधाकर नार्वेकर (रा. काळसे, बागवडी) व संदेश मठकर (रा. वालावल कुडाळ) यासह ४० ते ५० परप्रांतीय कामगार यांच्या विरोधात भादं.वि. कलम ३७९ व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापैकी सुदेश कोरगावकर याला ३० नोव्हेंबर रात्री मालवण पोलिसांनी अटक केली. तर उदय, विनोद, जयवंत, शाहू, सखाराम यांना १ डिसेंबर रोजी मालवण पोलिसांनी अटक केली. या सहाही संशयितांना मालवण पोलिसांनी १ डिसेंबरला मालवण न्यायालयात हजर केले असता ६ डिसेंबर पर्यत पोलीस कोठडी सुनावली. ६ डिसेंबरला संशयीत आरोपींना पुन्हा मालवण न्यायालयात हजर केले असता त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती.

या संशयित आरोपींचा जामीन अर्ज मालवण न्यायालयाने फेटाळल्यानंतर संशयित आरोपींनी जामीन मिळवण्यासाठी करिता जिल्हा व सत्र न्यायाधीश, ओरोस न्यायालयात जामीन अर्ज केला होता. यावर झालेल्या सुनावणी मध्ये न्यायालयाने सहाही आरोपींची प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या सशर्त जामीनावर मुक्तता केली आहे.

You cannot copy content of this page