विविध उपक्रमांनी राष्ट्रीय गणित दिवस संपन्न

वेंगुर्ला प्रतिनिधी– ज्येष्ठ गणिततज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस २२ डिसेंबर रोजी ‘राष्ट्रीय गणित दिवस‘ म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त येथील शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित प्रि.एम.आर.देसाई इंग्लिश स्कुलमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थी सहभागातून आयोजित केलेल्या गणित शैक्षणिक साहित्य प्रदर्शन व स्पर्धेचे उद्घाटन बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचे भौतिकशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डी. बी.राणे यांच्या हस्ते झाले.

या स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकांना गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या शैक्षणिक साहित्याचा दैनंदिन शिकवणीच्यावेळी कसा उपयोग करता येईल याबाबत शिक्षकांनी माहिती दिली.

यावेळी प्राचार्य डॉ.विलास देऊलकर, प्रा.चमणकर, प्रा.शितोळे, प्रा.बी.एम.भैरट, प्रा.आनंद बांदेकर, प्रा.नाईक, प्रा.चौगुले, संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण, मुख्याध्यापिका मिताली होडवडेकर, शिक्षिका नीलम नवार, धनश्री तुळसकर, संजया परब, मयुरी होडावडेकर, निकिता गावडे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page