जिल्ह्यात बांधलेल्या पाझर तलावापैकी केवळ तिनं तलावात पाण्याचा साठा कायम…

*💫सिंधूदुर्गनगरी दि.२८-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात १० ठिकाणी पाझर तलाव बांधकाम करण्यात आले आहेत .त्यापैकी केवळ बांदिवडे, कसाल, ओसरगाव, या तीन तलावांमध्येच पाण्याचा साठा कायम होतो .तर उर्वरित ७ तलावांमध्ये डिसेंबर नंतर पाणी राहत नाही.ही तलावे कोरडी पडतात. अशी माहिती सोमवारी झालेल्या जल व्यवस्थापन सभेत उघड झाली. यावर ज्यावेळी पाण्याची गरज असते तेव्हा पाणी मिळणार नसेल व डिसेंबर नंतर पाझर तलावात पाण्याचा साठा राहत नसेल तर ही तलावे बांधलीत कशाला ?असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला .त्यावर बोलताना संबंधित अधिकाऱ्याने ही पाझर तलावे आहेत. त्यामुळे यातील पाणी झिरपून विहिरींच्या पाण्याची पातळी मध्ये वाढ व्हावी. हाच उद्देश असल्याचे स्पष्ट केले.

You cannot copy content of this page