*💫कणकवली दि.२८-:* कणकवली अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या भूमी अभिलेख कर्मचारी प्रणीत प्रकाश आडेलकर रा . माणगांव याची अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायाधिश क्र . २ आर . बी . रोटे यांनी २० हजारच्या सशर्थ जाचमुचलक्यवार मुक्तता केली . संशयिताच्यावतीने अॅड . उमेश सावंत यांनी काम पाहिले . डिसेंबर २०२० मध्ये अल्पवयीन मुलगी क्लासला जात असताना तीच्या मागोमाग जाऊन छुपा पाठलाग करणे , तीच्या मोबाईलवर मेसेज पाठवून सतावणूक करणे , फिर्यादी व तीच्या कुटुंबियांना ठार मागण्याची धमकी देणे , तसेच तु माझ्याशी का बोलत नाहीस ? अशी विचारणा करत तीचा हात पकडल्याने प्रणीत आडेलकर याचेविरूद्ध येथील पोलीस स्टेशनला भादंवि कलम ३५४ अ , ३५४ ड , ( २ ) , ५०६ , ५०४ , ५०७ आणि बालकांचे लैंगिक शोषणापासून संरक्षण कायदा कलम ८ , ११ ( ४ ) व १२ प्रमाणे दाखल गुन्ह्यात संशयिताला शनिवारी रात्री अटक करण्यात आली होती. रविवारी विशेष न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडीची केलेली मागणी फेटाळून न्यायालयाने त्याच्या सादर केलेल्या जामिन अर्जावर सोमवारी सुनावणी घेत २० हजार रुपयांच्या सशर्थ जाचमुचलक्यावर मुक्तता करण्याचे आदेश दिले . यात पिडीतीच्या घरपरिसरात एक महिना जाऊ नये , तीच्याशी कोणत्याही प्रकारे संपर्क ठेऊ नये , तपासात सहकार्य करावे , तपासात ढवळाढवळ करू नये , अशा अटी घालण्यात आल्या आहेत .
विनयभंग प्रकरणात भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांला जामीन…
