धाकोरे येथे चोरी

दागिने व रोख रक्कम मिळून 1 लाख 35 हजारचा मुद्देमाल चोरीस;वेंगुर्ले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

*⚡वेंगुर्ले ता.१५- :* धाकोरे बागायतवाडी येथील पूर्वा चेतन गवस यांच्या घरातील कपाटामध्ये असलेले दागिने व रोख रक्कम मिळून 1 लाख 35 हजार 197 रुपये कोणीतरी अज्ञाताने चोरून नेले आहेत. आपल्याला रेडकर नामक एकावर संशय असल्याची तक्रार गवस यांनी वेंगुर्ले पोलिस ठाण्यात दिली आहे. त्या तक्रारीवरून पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

धाकोरे बागायत वाडी येथे गवस यांचे घर आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, या घरात पूजेच्या निमित्ताने येताना कुणीतरी आमच्या घरातील कपाटातील ९३ हजार ९७० रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र, ३६ हजार ५२७ रुपये किमतीचा सोन्याचा हार तसेच कपाटामधील रोख रक्कम ५००० रुपये असा एकूण १ लाख ३५ हजार १९७ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. ही चोरी २ डिसेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत घडली असून आपला रेडकर याच्यावर संशय आहे, असे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी वेंगुर्ले पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही. ए. केसरकर करीत आहेत.

You cannot copy content of this page