चक्कर येऊन दगडावर आपटल्याने मोरे येथील शिक्षक गंभीर जख्मी…

झाराप येथील खान मोहल्ला येथे चक्कर येऊन दगडावर आपटल्याने मोरे येथील प्राथमिक शाळेचे शिक्षक माधव विश्वनाथ थोटे गंभीर जख्मी झाले आहे. हा अपघात आज दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास घडला आहे. यावेळी सावंतवाडी काँग्रेस तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेलकर व त्यांचे सहकारी सामाजिक कार्यकर्ते राजू तेंडोलकर यांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी तातडीने त्यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघातात माधव थोटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याची माहिती महेंद्र सांगेलकर यांनी दिली.

You cannot copy content of this page