कुडासे हायस्कूलच्या सुचित्रा गोंधळी ची महाराष्ट्र साॅफ्टबाॅल संघात निवड

*⚡दोडामार्ग ता.१४-:* विभागीय क्रीडा संकूल औरंगाबाद येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य सब-ज्युनि.साॅफ्टबाॅल निवड चाचणीतून खेडा(गुजरात) येथे दि.१४ ते १८ डिसेंबर संपन्न होणार्‍या राष्ट्रीय साॅफ्टबाॅल स्पर्धाकरिता सरस्वती विद्यामंदिर व ज्युनि.काॅलेज सायन्स कुडासे ता.दोडामार्ग जि.सिंधुदुर्ग ची सुचित्रा सोमनाथ गोंधळी हिची महाराष्ट्र राज्य मुलीच्या संघात निवड झाली.

धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ,मुंबई संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सिमाताई तोरसकर,कार्याध्यक्ष डाॅ.मिलिंद तोरसकर,सचिवा श्रीमती कल्पनाताई तोरसकर,समन्वय सचिव लक्ष्मण पावसकर,प्रशासकीय अधिकारी मकरंद तोरसकर प्रशालेचे मुख्याध्यापक एस.एस.पाटील,जेष्ठ शिक्षक पी.एस.बस्तवाड,एस.के.परब ,शालेय समिती सदस्य सतिश मोरजकर,प्रशालेतील शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी ,कुडासे ग्रामस्थ यांनी सुचित्रा सोमनाथ गोंधळी हिचे अभिनंदन केले गेल्या अकरा वर्षात या प्रशालेतून २३ राष्ट्रीय तर ७२ राज्यस्तरीय खेळाडू घडले आहेत

You cannot copy content of this page