शिवसेनेचा भाजपला जोरदार धक्का…

माजी जिल्हा परिषद सदस्यासह कुटुंब शिवसेनेत; विद्याधर परब यांना सेनेकडून जिल्हा बँकेची उमेदवारी

सावंतवाडी ता.१३-:जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने भाजपला प्रामुख्याने भाजप युवा नेते विशाल परब यांना जोरदार धक्का दिला आहे. कट्टर राणे समर्थक माजी जिल्हा परिषद सदस्या आनंदी परब, रवींद्र परब, विद्याधर परब यांनी आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेने जाहीर प्रवेश केला आहे.

यावेळी विद्याधर परब यांना शेती संस्था गटातून जिल्हा बँकेची उमेदवारी आ. दीपक केसरकर यांनी जाहीर केली. तर कै. प्रकाश परब यांचा वारसा तळवडेत चालवण्यासाठी युवा नेतृत्व निर्माण झाले असल्याचे मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. विद्याधर परब यांनी जिल्हा बँकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, भाजपकडून उमेदवारी नाकारण्यात आल्यामुळे ते नाराज होते. त्यामुळे त्यांनी सहकुटुंब शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, बबन राणे, अशोक दळवी, बाबु कुडतरकर यांसह तळवडे येथील पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page