आजगाव येथे १६ रोजी ‘संगीत गोकुळचा चोर’…

*⚡सावंतवाडी ता.१४– :* श्री राधाकृष्ण संगीत साधना सिंधुदुर्ग निर्मित, अण्णासाहेब शिरगोपीकर लिखित, वसंत साळगावकर दिग्दर्शित ‘संगीत गोकुळचा चोर’ या भव्य ट्रिकसिनयुक्त पौराणिक संगीत नाट्यकृतीचे आयोजन १६ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता आजगाव येथे आजगाव शाळा नं. १ च्या पटांगणावर करण्यात आले आहे.

या नाटकात वैष्णवी प्रभू, ममता प्रभू, गौरी पारकर, अदिती राजाध्यक्ष चिन्मय प्रभुराळकर, ललित सातोस्कर, जयराम प्रभू, चिन्मय गवंडे, संकेत हरमलकर, प्रतीक्षा आरोलकर, मुग्धा गावडे, मनवा साळगावकर, गायत्री पांढरे, दिक्षा काकतकर, आणि कृष्णाच्या मध्यवर्ती भूमिकेत तेजल गावडे अभिनय साकारणार आहेत. सांगीतसाथ साहिल घुबे (हार्मोनियम), दत्ताराम सावंत (तबला) करणार आहेत. या नाटकाची संकल्पना वीणा दळवी यांची असून संयोजन आजगाव भोमवाडी ग्रामस्थांनी केले आहे. नाट्यरसिकानी या नाट्यकृतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page