व्हेल माश्याच्या उलटीची तस्करी करताना गोव्यातील तीन संशयीत कोट्यवधीच्या मुद्देमालसह ताब्यात

*⚡बांदा ता.११-:* आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी असलेली व कोट्यावधी रुपये किंमत असलेली व्हेल माश्याची उल्टी बांदा बाजारपेठेत स्थानिक गुन्हा अन्वेषण सिंधुदुर्गच्या पथकाने सापळा रचून बांदा बाजारपेठ येथे गोवा येथून आलेल्या संशयिताना पकडले. यामध्ये 5 कोटी 32 लाख कींमतीच्या मुद्देमालासह तीन संशयीत आरोपींना ताब्यात घेण्यात आले. बांदा या ठिकाणी तीन संशयित वन्य संरक्षीत प्राणी व्हेल माशाचे उलटीची ज्याचे खरेदी विक्रीवर शासनाने बंदी आणलेली आहे ती वस्तु बेकायदेशीररित्या विकण्याकरीता बांदा परीसरात येणार असल्याची माहीती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला गुप्त पद्धतीने मिळाली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तसा बांदा गांधीचौक बाजारपेठेत सापळा रचला व गोव्यातील तीन संशयित त्यांच्या ताब्यातील स्वीप्ट कार व मोटर सायकलसह संशयित ताब्यात घेतले. सदर संशयित एका पिशवीमधुन ५ किलो २३२ ग्रॅम वजनाची व्हेल माशाची उलटी ज्याची किंमत साधारणत: ५,३२,२०००० रुपये (५ कोटी ३२ लाख २० हजार रुपये) आहे. ही उलटी जप्त करण्यात आली आहे. सदर कारवाईप्रमाणे तिन्ही संशयित आरोपीना ताब्यात घेत वन्यप्राणी संरक्षण कायदा १९७२ चे कलम ३९, ४४, ४८, ४९ (ब) ५१, ५७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे. सदरची कारवाई सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अपर पोलीस अधिक्षक नितीन बगाटे यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल धनावडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग यांचे सुचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखचे सपोनि महेंद्र घाग, पोउनि सचिन शेळके, पोहेकॉ/ अनिल धुरी, आशिष गंगावणे, प्रकाश कदम, अनुपकुमार खंडे, प्रवीण वालावलकर, पोना/ चंद्रकांत पालकर, पोकॉ/ ज्ञानेश्वर कांदळगांवकर, प्रथमेश गावडे यांनी केलेली आहे. वनविभागातील मा. उपवनसंरक्षक शहाजी नारनवर, वनरक्षक डी.बी.शिंदे, वनक्षेत्रपाल सावंतवाडी मदन शिरसागर, वनपाल अनिल मेस्त्री, प्रमोद राणे, शशिकांत देसाई, प्रविण पाटील यांनीही कारवाई करण्यात सहकार्य केले.

You cannot copy content of this page