*चारचाकी व दुचाकी अपघातात दाम्पत्य जखमी*

झाराप-पत्रादेवी मार्गावर जोशी-मांजरेकरवाडी येथे घडला अपघात

सावंतवाडी : झाराप-पत्रादेवी मार्गावर मळगाव जोशी- मांजरेकरवाडी येथील सर्कलजवळ गोवाच्या दिशेने जात असलेल्या चारचाकी व रस्ता क्रॉस करत असलेल्या दुचाकी यांच्यात अपघात होऊन एक दाम्पत्य जख्मी झाले आहे. त्यांना तेथील स्थानिक नागरिकांच्या मदतीने उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान सावंतवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरू आहे.

या अपघातानंतर मळगाव येथील स्थानिक नागरिकांनी मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे यांना या अपघाताची माहिती देताच त्यानी लगेच तेथे धाव घेत अपघात ग्रस्त दाम्पत्याला मदत केली. यावेळी ग्रामस्थांनी उपसरपंच हेमंत मराठे यांचे आभार व्यक्त केले.

You cannot copy content of this page