पराभव समोर असल्याने निवडणुका पुढे ढकलण्याचे काम

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा राज्य सरकारवर आरोप

*⚡ओरोस ता.११-:* राज्यात असलेल्या तीन पक्षाला कुठलीच निवडणूक नको आहे. कारण लोक त्यांच्या पाठीमागे नसल्याने त्यांना निवडून देणार नाहीत. त्यामुळे राज्य सरकार आजचे मरण उद्यावर ढकलत निवडणुका पुढे ढकलत असल्याचा आरोप केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी शनिवारी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

पडवे येथील हॉस्पिटलच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री राणे बोलत होते. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, डॉ. मिलिंद कुलकर्णी उपस्थित होते.

पुढे बोलताना राणे यांनी, राज्यात अनेक विषय आहेत. केंद्रातील अनेक विषय मी हाताळत आहे. अधिवेशनाला दोन आठवडे झाले आहेत. अधिवेशन सुरळीत चालू आहे. कायदे करणारी बिले मंजूर होत आहेत. लष्कराच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला ही दुर्दैवी घटना घडली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भारत आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने काम करत आहेत. देशाच्या समस्या अडचणी मोदी सरकार सोडवीत आहेत. कोरोना कंट्रोल मध्ये आला आहे, असे सांगितले.

You cannot copy content of this page