सावंतवाडी : सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी मधुलिका रावत आणि अन्य 12 लष्करी अधिकाऱ्यांना सावंतवाडीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. केशवसुत कट्टा इथे भारत मातेच्या या वीर सुपुत्रांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. नगराध्यक्ष संजू परब यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. तर उपस्थित नगराध्यक्ष संजू परब, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, रोटरी क्लब सावंतवाडीचे म्हापसेकर, दत्तप्रसाद गोठसरकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी वंदे मातरम् म्हणून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष संजू परब, भाजप नेते अतुल काळसेकर, नगरसेवक आनंद नेवगी, मनोज नाईक, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, सतिश पाटणकर, बंटी पुरोहित, अमित परब, नेमळे सरपंच विनोद राऊळ, अँड. अनिल निरवडेकर, अजय सावंत, परिक्षित मांजरेकर, प्रा. शैलेश नाईक, प्रा. सतिश बागवे, दत्तप्रसाद गोठसरकर, प्रदीप ढोरे, देवेंद्र टेंमकर, संतोष जोईल, बावतीस फर्नांडिस, प्रसाद दळवी, आसावरी शिरोडकर, वैभव नाटेकर, दीपक म्हापसेकर , प्रशांत टोपले, नारायण आडारकर, श्री. बिद्रे आदी उपस्थित होते.
सीडीएस बिपिन रावत यांच्यासह अन्य शहिदांना सावंतवाडी वासियानी वाहिली श्रध्दांजली…
