*⚡कणकवली ता.११-:* सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ आणि नांदगाव व्यापारी संघटना यांच्यावतीने नांदगाव येथील आयडीयल कंप्युटर एज्युकेशन ऋषिकेश मोरजकर यांच्या येथे सर्व व्यापाऱ्यांच्या सोईसाठी अन्न सुरक्षा परवाना नुतनीकरण कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. यावेळी अन्न सुरक्षा परवाना नूतनीकरण व नवीन परवाना संदर्भात संबंधित व्यापारी वर्गाचे अर्ज भरून घेण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील सर्व व्यापारी वर्गाला अन्न सुरक्षा परवाना नव्याने काढता यावा किंवा त्याचे नुतनीकरण सुलभपणे करता यावे यासाठी जिल्हा व्यापारी महासंघाने संपूर्ण जिल्हाभर विविध बाजारपेठांच्या ठिकाणी अन्न सुरक्षा परवाना कॅम्पचे आयोजन रविवार 12 डिसेंबर रोजी दुपारी 3 ते 5 या वेळेत केले आहे. यामुळे व्यापारी वर्गाला अन्यत्र फेऱ्या माराव्या न लागता इथल्या इथेच कागदपत्रे सादर करुन परवाना मिळण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आल्याने व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. 1 जानेवारीपासून अन्न सुरक्षा परवाना नसल्यास 10 हजार ते 1 लाख पर्यंत दंड होऊ शकतो, असे व्यापारी महासंघाच्या वतीने सांगण्यात अले आहे. तरी याचा सर्व व्यापारी वर्गाने लाभ घ्यावा, असे आवाहन नांदगाव व्यापारी संघटना अध्यक्ष पंढरी वायंगणकर यांनी व्यापारी वर्गाला केले आहे.
नांदगाव येथे उद्या अन्न सुरक्षा परवाना नुतनीकरण कॅम्प
