मळगाव वाचनमंदिर येथे लवकरच पोलीस भरतीपूर्व मार्गदर्शन व प्रशिक्षण

सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक दयानंद गवस यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणाचे आयोजन

*⚡सावंतवाडी ता.११-:* मळगाव येथील कै. उदय रमाकांत खानोलकर वाचनमंदिर येथे वाचनमंदिर व सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक दयानंद गवस यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली तसेच गावातील सामाजिक संस्था यांच्या सौजन्याने मळगाव पंचक्रोशीतील युवक युवतींसाठी लवकरच पोलीस भरतीपूर्व मार्गदर्शन व प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे.

या प्रशिक्षणासाठी प्रथम नावनोंदणी करणाऱ्या फक्त ५० युवक युवतींची नोंदणी करण्यात येणार आहे. यासाठी कोणत्याही शाखेची पदवी, किंवा किमान १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणात अनुभवी व तज्ञ मार्गदर्शकांचा लाभ मिळणार आहे. या प्रशिक्षणात भाग घेऊ इच्छिणाऱ्या युवक युवतींनी १६ डिसेंबरपर्यंत आपल्या नावाची नोंदणी हेमंत खानोलकर- ९८८१७१३९३८ व गुरुनाथ नार्वेकर- ९४२२३७९३४६ यांच्याशी संपर्क साधून किंवा कै. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर येथे करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page