सानेगुरुजी जयंतीनिमित्त २४ डिसेंबरला कथाकथन स्पर्धेचे आयोजन…

श्री राम वाचन मंदिर व क्रीडा भवन यांचे आयोजन; कार्यवाह रमेश बोंद्रे यांची माहिती

*⚡सावंतवाडी ता.११-:* पू सानेगुरुजी जयंतीनिमित्त श्रीराम वाचन मंदिर व क्रीडा भवन सावंतवाडी संस्थेच्या वतीने 24 डिसेंबर रोजी सकाळी 10:00 वा तालुक्यातील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे ही स्पर्धा 2 गटात होणार असून जी प शाळांनी या स्पर्धेसाठी स्पर्धक पाठवून सहकार्य करण्याचे आवाहन कार्यवाह रमेश बोंद्रे यांनी केले आहे.

सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष व ज्येष्ठ समाजवादी दिवंगत नेते कै.दत्तारम वाडकर यांनी संस्थेकडे कायमस्वरूपी ठेवलेल्या ठेव रक्कमेच्या व्याजातून दरवर्षी ह्या स्पर्धेचे आयोजन केले जाते गेली २६ वर्षे ही स्पर्धा सुरू आहे ह्या वर्षी देखील या कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून गट पहिला इयत्ता ५ वी ते ७ वी असून प्रथम क्रमांक – रु. २०१ , द्वितीय क्रमांक- रु. १५१,तृतीय क्रमांक – रु. १०१ व दुसरा गट इयत्ता ८ वी ते १० वी असून प्रथम क्रमांक रु. २५१, द्वितीय क्रमांक- रु. २०१, तृतीय क्रमांक रु. १५१ अशी पारितोषिक ठेवण्यात आली आहेय ही स्पर्धा सावंतवाडी तालुक्यातील जिल्हा परिषद च्या ५ वी ते १० वी च्या विद्यार्थापुरतीच मर्यादीत राहणार आहे.

श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी येथे सकाळी 10 वा स्पर्धेला सुरुवात होणार असून स्पर्धेसाठी कोणत्याही संस्कारक्षम कथेची निवड स्पर्धकांनी करावी स्पर्धकाला ५ मिनिटे वेळ दिला जाईल. परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील. स्पर्धा आटोपल्यावर त्याच ठिकाणी बक्षीस वितरण समारंभ होईल. प्रत्येक शाळेतून प्रत्येक गटातून दोनच स्पर्धक विद्यार्थ्यांना भाग घेता येईल. स्पर्धकांची नावे स्पर्धा सुरू होण्यापूर्वी अर्धा तास अगोदर पर्यंत स्विकारली जाणार आहेत

You cannot copy content of this page